ABP Majha Headlines : 10 AM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 10 AM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात पुन्हा एकदा राजकीय द्वंद्व रंगणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे भाजपविरोधात इर्ष्येने लढताना दिसून आले आहेत. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या जोडगोळीवर जोरदार हल्ला चढवला होता. मोदी-शाह यांच्यावर थेटपणे हल्ला चढवण्याची हिंमत दाखवणाऱ्या देशातील मोजक्या नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा समावेश होतो. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही ठाकरे Vs मोदी-शाह आणि भाजप यांच्यात थेट सामना होणार आहे. मात्र, या सगळ्या धामधुमीत ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
सध्या उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात टोकाचे वाद आहेत. अलीकडच्या काळात दोन्ही नेत्यांकडून परस्परांवर बोचरी टीका करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे आणि मोदी-शाह यांच्यात समेट होण्याची शक्यता नजीकच्या काळात तरी दृष्टीपथात नाही. अशी सगळी परिस्थिती असताना ठाकरे गटाचे विधानपरिषदचे आमदार, सचिव व उद्धव ठाकरेंचे स्विय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी सोमवारी रात्री 12 वाजून 23 मिनिटांनी अमित शाह यांना एक्स पोस्टच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.