ABP Majha Headlines : 4 PM : 22 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 4 PM : 22 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
शरद पवारांचाच जरांगेंना वारंवार फोन, पवारांच्या सांगण्यानुसारच जरांगे वागतात, आरक्षण कार्यकर्त्या संगीता वानखेडे यांचा गंभीर आरोप
अजय बारसकर गावातल्या महिलांवर अत्याचार करतो, जरांगेंचा गंभीर आरोप, शिंदे फडणवीसांनी सुपारी दिल्याचा आरोप, तर सरकारला ट्रॅप लावायची गरज नाही, शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
आंदोलनात वृद्धांच्या जिवाला काही झाल्यास जरांगेच जबाबदार, मंत्री भुजबळांचं प्रत्युत्तर, जरांगे कोणाचीही पर्वा करत नसल्याची टीका
मुंबईतील कुर्ल्यात वंचित बहुजन आघाडीचा रास्तारोको, महापालिकेने विनानोटीस पक्षकार्यालय तोडल्याचा वंचितचा आरोप
पुण्यात पब संस्कृतीतून ड्रग्जचा महापूर त्यामुळे पुण्यात पब नकोतच, काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांची मागणी
वाढवण बंदराविरोधात सुरू असलेला रास्तारोको अखेर मागे, तब्बल अडीच तासांनंतर रास्तारोको आंदोलक हटले, सकाळपासून रखडलेली वाहतूक अखेर सुरू
मुंबईतल्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचा पहिला टप्पा फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू, पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन
देशभरात सीबीआयचे ३० ठिकाणांवर छापे, जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक
यांच्यासह निकटवर्तींवर छापेमारी, मुंबईसह यूपी, बिहार, राजस्थान, हरियाणातही कारवाई
शिंदे-फडणवीस सरकारकडून अदानींना मुंबईविकण्याचा घाट सुरु, संजय राऊत यांचा गंभीर आरोप, देवेंद्र फडणवीस मुंबईचा सौदा करत असल्याचं राऊतांचं वक्तव्य
राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून संप, अजित पवारांसोबतच्या बैठकीत आश्वासनांची पूर्तता न झाल्याने संपाची हाक