ABP Majha Headlines : 10 AM : 22 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTOP HEADLINES: उद्धव ठाकरेंचा आजपासून दोन दिवसांच्या बुलढाणा दौऱ्यावर, लोकसभा मतदारसंघात आज आणि उद्या एकूण सहा सभा
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची कुटुंबीयांची कधीही मागणी नव्हती, नड्डांच्या भेटीनंतर रणजीत सावरकरांची स्पष्टोक्ती
राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून संप, अजित पवारांसोबतच्या बैठकीत आश्वासनांची पूर्तता न झाल्याने संपाची हाक
समुद्रात सुरू असलेल्या JSW कंपनीच्या कामामुळेच रत्नागिरीतल्या जयगड किल्ल्याच्या बुरुजाला तडे, पंचांचा JSW कंपनीवर आरोप, लवकरच कारवाईचा निर्णय घेणार
महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं आज वितरण, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पुरस्कार प्रदान होणार, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
उसाचा खरेदी दर प्रतिटन ३१५० वरुन ३४०० रुपयांवर, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, १ ऑक्टोबरपासून सुधारित एफआरपी लागू होणार
लग्न झाले म्हणून महिलेला नोकरीतून काढता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, याचिकाकर्त्या महिलेला 26 वर्षे जुन्या प्रकरणात न्याय