ABP News

ABP Majha Headlines : 1 PM : 22 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  1 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुणे शहरात आंदोलन (MPSC Students Protest Pune) करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलनाला आता विरोधी पक्ष नेत्यांनी देखील पाठिंबा दिला आहे, तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंती केली असून आज महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. तर या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा जाहीर करत अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना खोचक टोला लगावत परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे  आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी आल्यानं एक परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी 'एमपीएससी' विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोडवर आंदोलन (MPSC Students Protest Pune) सुरू केलं आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भेट देत पाठिंबा दिला आणि ते रात्रभर मुलांसोबतच आंदोलनाला बसले होते. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी राज्य सरकारला इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्या, अन्यथा हे उपोषण असंच सुरू राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या आंदोलनाला शरद पवार (Sharad Pawar) यांनीही पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर सरकारमधील मंत्री आणि अधिकारी यांचा मॉर्निंग वॉक, अंघोळ, चहा-नाश्ता झाला असेलच... त्यामुळं आता तातडीने विद्यार्थ्यांची मागणी मान्य करणारं नोटिफिकेशन काढा, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram