ABP Majha Headlines : 9 AM : 21 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 AM : 21 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 65.11 टक्के मतदानाची नोंद झाली असून सर्वाधिक मतदान कोल्हापुरात, तर मुंबईत सर्वात कमी 52.07 टक्के मतदान झालं आहे. मनसेने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी 'एकला चलो रे'चा नारा दिला. मनसेचे राज्यात 128 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले. वेगवेगळ्या संस्थांने केलेले एक्झिट पोलच्या अंदाजानूसार मनसेला यंदाच्या निवडणुकीत देखील अपयश मिळताना दिसत आहे. मात्र 2019 च्या तुलनेत मनसेला यश मिळताना दिसत आहे. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचा एक उमेदवार (राजू पाटील) निवडून आला होता. पंरतु 2024 च्या दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनूसार मनसेला 2 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज असून 23 नोव्हेंबरलाच निवडणुकीचा निकाल स्पष्ट होणार आहे. (Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024)