ABP Majha Headlines : 8 AM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 8 AM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि तीन वेळा आमदार राहिलेले बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची त्यांच्याच मतदारसंघात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. 12 ऑक्टोबरला सदर घटना घडली. या घटनेनंतर अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येमागे बिश्नोई गँग (Lawrence Bishnoi Gang) असल्याचा दावा एका फेसबुक पोस्टमधून करण्यात आला आहे. याची सखोल चौकशी सध्या सुरू आहे. गोळ्या घालणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशात वरातीत गोळीबार करण्याची प्रथा आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात फरार असलेला आरोपी शिवकुमार गौतमने (Shivkumar Gautam) काही वेळेस गावातील वरातींमध्ये हवेत गोळीबार केला होता आणि हेच पाहून शिवकुमार गौतमची निवड करण्यात आली होती. तसेच शिवकुमार गौतमनेच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्याचे तपासात दिसून येत आहे. या प्रकरणातील आरोपी स्नॅपचॅट, इन्स्टाद्वारे संवाद साधत असल्याचे चौकशीत समोर आले. चॅटिंगसाठी स्नॅपचॅट, तर इन्स्टाद्वारे व्हिडीओ कॉल करत असल्याचे समोर आले आहे.