ABP Majha Headlines : 11 AM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

 ABP Majha Headlines :  11 AM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

 राज्यात (Maharashtra News) अद्याप आगामी विधानसभा निवडणुकांचं (Vidhan Sabha Elections 2024) बिगुल वाजलं नाही. तरीसुद्धा सर्व राजकीय पक्षांनी विधानसभेचं मैदान मारण्यासाठी आपापल्या परीनं प्रयत्न सुरू केले आहेत. यंदाच्या निवडणुकीत राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) अशी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, अशातच निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी राज्य सरकारनं निर्णयांचा धडाका लावला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत सरकारनं एकापाठोपाठ एक असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 

आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून दहा दिवसात बाराशे पेक्षा अधिक शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. आचारसंहिता लागेपर्यंत शासन निर्णयांचा राज्य सरकारकडून धडाका लावला आहे. तर मागील महिनाभरात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये  132 निर्णय घेण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रलंबित राहिलेले सर्व निर्णय राज्य सरकारनं जाहीर केलेत. राज्य सरकारकडून रेकॉर्ड ब्रेक निर्णय घेतले जात असल्यानं निधीबाबत आता वित्त विभागासमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram