ABP Majha Headlines : 7 PM : 2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 PM : 2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मी महिलांचा कधीही अपमान केला नाही आणि करणारही नाही. माझ्या वक्तव्यामुळं जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Aravind Sawant) यांनी केलं. 29 तारखेला मी जे काही बोललो आहे, त्यानंतर 1 तारखेला अनेक भगिनी या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि माझ्या वर गुन्हा दाखल झाल्याचे सावंत म्हणाले. अरविंद सावंत यांनी शायना एनसी (Shaina NC) यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य केलं होतं. याबाबत त्यांनी माफी मागितली आहे. आपण बघताय दोन दिवस झाले माझ्यावर एकप्रकारे हल्ला सुरु आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले. उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून मी काम करतो. माझ्यावर ज्या प्रकारे अनेक जणांनी हल्ले केले त्यांनी माझ्या काही प्रश्नांची उत्तर द्यावी असे सावंत म्हणाले. 29 तारखेला मी जे काही बोललो आहे. त्यानंतर 1 तारखेला भगिनी ह्या पोलीस स्टेशन मध्ये गेल्या आणि माझ्या वर गुन्हा दाखल झाला आहे. माझ्या वक्तव्यामुळे जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे सावतं म्हणाले.