ABP Majha Headlines : 6 PM : 2 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

 ABP Majha Headlines :  6 PM :  2 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

नाशिक, हिंगोली, यवतमाळ वाशीम मतदारसंघासाठी वर्षा निवासस्थानी बैठकांचा सिलसिला, एक तासापासून भावना गवळी, हेमंत गोडसे, हेमंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू
काँग्रेसमध्ये सेक्युलर विचारधारेचा अतिरेक, माझा कट्ट्यावर संजय निरुपम यांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा..तर जिथे रिस्पेक्ट नाही तिथे थांबायचं कशाला, काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर निरुपम यांचं उत्तर
मुंबईत पाचही जागांवर ठाकरेंचे उमेदवार पराभूत होणार, माझा कट्ट्यावर संजय निरुपम यांचा दावा तर संजय राऊतांनी शिवसेना, राष्ट्रवादी संपवली आता काँग्रेसही संपवतायत, निरुपम यांची राऊतांसह  ठाकरेंवर टीका
उन्मेश पाटील उद्या दुपारी १२ वाजता ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता, जळगावमधून भाजपने उमेदवारी नाकारल्यानं उन्मेश पाटील नाराज
लोकसभा निवडणुका ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवर घ्या, संजय राऊतांची पुन्हा एकदा मागणी
सोलापुरात वंचितपाठोपाठ एमआयएमही मैदानात उतरण्याच्या तयारीत, माजी आमदार रमेश कदमांशी एमआयएमची चर्चा, वंचित आणि एमआयएमही उतरल्यास काँग्रेसच्या अडचणी वाढणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram