ABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 25 July 2024 Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स  1 PM 25 July 2024 Marathi News

सहा वेळा लोकसभा निवडणूक लढवलेले चंद्रकांत खैरे आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार, संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाटांना देणार आव्हान..

काही पक्ष महाराष्ट्रविरोधी भूमिका घेण्यासाठी बनलेत, संजय राऊतांची राज ठाकरेंचं नाव न घेता टीका, भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची महिन्याभरात स्वबळाची भाषा कशी असा सवाल..

शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टात धाव, ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्यासाठी तातडीने सुनावणीची मागणी, अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान

पुण्यात आज पावसाची विश्रांती, खडकवासला धरणातून विसर्ग घटला, पूर ओसरल्यावर नुकसानाचं धक्कादायक वास्तव उघड

पुण्यातली पूरस्थिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमुळंच, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आरोप, पूर्वसूचना न देताच खडकवासला धरणातून पाणी का सोडलं असा सवाल..

सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीला पूरस्थिती, कर्नाळ रस्ता पाण्याखाली, पलूस तालुक्यातल्या काही गावांचा संपर्क तुटला, कोयना धरणातून २० हजार क्युसेकने विसर्ग सुरूच

सांगली शहरातले ८० कैदी कोल्हापूरच्या तुरुंगामध्ये हलवले, सांगलीतली पूरस्थिती पाहून खबरदारीचा उपाय, आणखी काही कैदी आज हलवलणार...

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram