ABP Majha Headlines : 7 AM : 19 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  7 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (20 नोव्हेंबर) मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेबरला मतमोजणी पार पडेल. मात्र याचदरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरा नगर भागातील एक घटना समोर आली आहे.   मतदानकार्ड जमा करून 1500 रुपये देणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील औरंगाबाद पश्चिम मतदार संघात ही घटना घडली आहे. आपल्या मत मिळणार नाही अशा लोकांनी मतदान करु नये म्हणून दीड हजार रुपये देऊन मतदानकार्ड जामा केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत तब्बल पाच हजार मतदानकार्ड जमा केल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्यात सदरील व्यक्तीची चौकशी सुरू आहे.   ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे काय म्हणाले? ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली सदर प्रकरणावर ट्विट करत भाष्य केले आहे.  छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण 18 लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे 2 कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे. याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. 'कर्तव्यदक्ष' जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली, हा प्रश्न आहे, असं अंबादास दानवे ट्विट करत म्हणाले. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram