ABP Majha Headlines : 10 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

मुंबईसह महाराष्ट्रात उद्या १३ जागांवर मतदान, आज करणार मतदान साहित्याचं वाटप, पोलिसांचं कडक बंदोबस्त  

मुंबईतल्या तीन मतदारसंघात दोन शिवसेना आमने-सामने, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे लढत, वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकर रवींद्र वायकरांना भिडणार 

आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर आयकर विभागाचे छापे. ४०कोटींची रोकड जप्त. तर बूट व्यापारी कर चुकवत असल्याची आयकर विभागाकडे माहिती.  

मुंबईत आज आणि उद्या उकाडा कायम राहणार, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यानं मुंबईकर घामाघूम 

मान्सून आज अंदमानात दाखल होणार, ३१ मे रोजी केरळ आणि ७ जूनला महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज 

वरंधा घाट वाहतुकीसाठी येत्या ३१मेपर्यंत बंद राहणार. घाट बंद असल्यानं प्रवाशांना ताम्हिणी,आंबेनळी घाटामार्गे प्रवास करावा लागणार.  

 

हेही व्हिडिओ पाहा 

 

Sanjay Raut Majha Vision 2024:मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, माझा व्हिजनमध्ये राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut Majha Vision 2024: मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही, माझा व्हिजनमध्ये राऊतांचा मोठा दावा संजय राऊत म्हणाले,  मोदी शाह यांनी ठरवलं तर ते कुणालाही जेलमध्ये टाकू शकतात , पण सत्ता कायमची नाही, तुम्ही जे पेरले ते उगवणार आहे.  सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शहांची दाढी जळाली आहे.  मोदी शाह खोटारडे, त्यांनी देशाला तेच धडे दिले. शिंदे आणि अजित पवार हे बुडबुडे आहेत.  भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जून नंतर कळेल. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, मोदी कुठून जागा आणणार  आहे.  शिंदे, दादांची एकही जागा मिळणार नाही.   आम्ही 30 ते 35  जागा जिंकणार आहे 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram