ABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहामुंबईसह ठाणे, नाशिक, धुळ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या सकाळी ७ वाजल्यापासून मतदान
मुंबईतल्या तीन मतदारसंघात दोन शिवसेना आमने-सामने, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे लढत, वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकर रवींद्र वायकरांना भिडणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ५२ दिवसांत घेतल्या ११५ सभा, मुलाखतींचा आकडा तब्बल ६७वर
आज १२ वाजता भाजप कार्यालयात भेटा,केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना आव्हान, पीए बिभव कुमार यांच्या अटकेनंतर केजरीवाल आक्रमक
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर आयकर विभागाचे छापे. ४०कोटींची रोकड जप्त. तर बूट व्यापारी कर चुकवत असल्याची आयकर विभागाकडे माहिती.
निवडणूक काळात देशभरात तब्बल ९ हजार कोटींचा मुद्देमाल जप्त.. तर एकट्या महाराष्ट्रातून ६८५ कोटींच्या मुद्देमालावर कारवाई
सिंगापूर एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांची मे महिन्यातच दिवाळी, बोनस म्हणून आठ महिन्यांचा पगार मिळणार
वरंधा घाट वाहतुकीसाठी येत्या ३१मेपर्यंत बंद राहणार. घाट बंद असल्यानं प्रवाशांना ताम्हिणी,आंबेनळी घाटामार्गे प्रवास करावा लागणार.