ABP Majha Headlines : 6PM : 19 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 6PM : 19 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शाहांमध्ये अर्धा तास चर्चा, दिल्लीतल्या निवासस्थानी झाली बैठक, मनसे महायुतीतला नवा घटक पक्ष होणार का याची उत्सुकता
महाराष्ट्रात ठाकरे नावाशिवाय मतं मिळत नाहीत, आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न, राज ठाकरे आणि शाहांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका
राज ठाकरेंच्या दिल्लीवारीनं शिंदेंच्या खासदारांची धाकधूक वाढली, मनसेच्या एन्ट्रीनं शिंदेंच्या जागा कमी होण्याची खासदारांना भीती
अमित शाहांच्या निवासस्थानी आज महायुतीची बैठक, अजित पवारही उपस्थित राहण्याची शक्यता, जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार का याची उत्सुकता
माढा लोकसभा मतदारसंघाबाबत सागर बंगल्यावर बैठक, कार्य़कर्त्यांशी चर्चा करुन निर्णय दोन दिवसांत निर्णय घेणार, रामराजे नाईक निंबाळरांची माझाला माहिती
महाविकास आघाडीचं जागावाटप जवळ जवळ पूर्ण, नांदेडमधल्या सभेत उद्धव ठाकरेंचं माहिती, एक ते दोन दिवसांत मविआच्या जागावाटपाची घोषणा होणार असल्याचीही ठाकरेंकडून स्पष्ट
सांगलीची जागा १०० टक्के ठाकरे गटाचीच, संजय राऊतांचा दावा, ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस नाराज, काँग्रेस नेते आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची शक्यता