ABP Majha Headlines : 6:30 AM : 19 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  6:30 AM : 19 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर  ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅबिनेटची आज संध्याकाळी ५ वाजता बैठक, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीचीही बैठक होणार.
राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात...१७ हजार जागांसाठी तब्बल १७ लाख अर्ज, ४० टक्के उमेदवार उच्चशिक्षित... 
मुंबईतील ५० पेक्षा अधिक रुग्णालय, महाविद्यालय आणि मुंबई महापालिका मुख्यालयाला धमकीचा ई-मेल, पोलिसांचा तपास सुरु.
मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अतिशय सूचक विधान 
छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर एव्हाना मुख्यमंत्री झाले असते, संजय राऊतांचं वक्तव्य तर शिवसेना सोडणारे सगळे अस्वस्थ आत्मे, राऊतांची टीका

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram