ABP Majha Headlines : 8 AM : 19 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 8 AM : 19 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स .. छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९४वी जयंती, राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन... किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार.... सोलापुरात शिवजन्मोत्सव, मध्यरात्री १२ वाजता पाळणा सोहळा साजरा तर आग्रा किल्ल्याच्या दिवान-ए-आममध्ये छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा एकदा गुंजणार ... अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर पुन्हा एकदा शिवरायांच्या पुतळ्यासाठी चौथरा तयार, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, दंगल नियंत्रण पथकही तैनात... राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर आज सुनावणी, चिन्ह, पक्ष अजित पवार गटाला दिल्याच्या विरोधात शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका... मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दहावा दिवस, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास २१ तारखेला आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार, जरांगेंचं स्पष्टीकरण... २० मे २०२२ ला शिंदे वर्षावर रडत आले होते आणि एका महिन्यात भाजपसोबत गेले, माणूस म्हणून शिंदे अपयशी ठरले, मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल करत आदित्य ठाकरेंचा निशाणा ... काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज अमेठीत, तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणीही आजपासून अमेठीच्या दौऱ्यावर...