ABP Majha Headlines : 6:30 AM : 18 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6:30 AM : 18 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स कोल्हापुरातील महाधिवेशनातून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, मला मारण्याचा कट होता, शिंदेंचा आरोप, तर ठाकरेंना खोके नाही कंटेनर लागतात, शिंदेची टीका राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी, चिन्ह, पक्ष अजित पवार गटाला, याविरोधात शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर राज्यभरातून हरकती आणि सुचना मागविण्यात आल्या होत्या. या हरकती आणि सूचनांचा EXCLUSIVE अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय. या हरकती आणि सूचनांमधे 40 टक्के लोकांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याची शिफारस केलीय. तर 41 टक्के लोकांनी सामाजिकदृष्ट्या मागास नसल्याचा अभिप्राय दिलाय. ज्यांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा अभिप्राय दिलाय त्या 40 टक्क्यापैकी 31 टक्के लोकांनी मराठा समाज सामाजिक मागास असल्याचं म्हटलय. तर 9 टक्के लोकांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असला तरी मराठा समाजाला ओबीसींमधे नाही तर स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस केलीय. या अहवालानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश संदीप शुक्रे यांनी मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असून आरक्षणास पात्र असल्याची शिफारस सरकारला केलीय.