ABP Majha Headlines : 10:00AM : 17 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्षच अंधारात, बडगुजरांच्या प्रवेशासंबंधी कल्पना नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण, बडगुजर नाशिकहून मुंबईला रवाना
ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर आज भाजपात प्रवेश करणार, स्थानिक आमदार सीमा हिरेंचा विरोध डावलून बडगुजर भाजपात जाणार ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या आज वरळीत बैठका, वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व, दोन्ही शिवसेनेच्या बैठक स्थळांमध्ये अवघं २०० मीटरचं अंतर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुक्तागिरी बंगल्यावर पार पडली सर्व मंत्र्यांची बैठक, शिवसेनेचा वर्धापन दिन आणि इतर घडामोडींचा शिंदेंनी आढावा घेतल्याची माहिती
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला २० गावांचा विरोध...हद्दवाढ झाल्यास झेडपी, मनपा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा.. मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे गावकऱ्यांचं लक्ष
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सर्व पुलांचं ऑडिट करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सर्व पुलांचं ऑडिट करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील क्रू मेंबर श्रद्धा धवन यांच्यावर काल रात्री अंत्यसंस्कार तर मुख्य पायलट सुमीत सभरवाल यांचा पार्थिव मुंबईत, अंधेरीत होणार अंत्यसंस्कार
रत्नागिरी, सिंधुदुर्गला आज ऑरेंज तर रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईसाठी यलो अलर्ट, तर काल दिवसभर मुंबईसह उपनगर, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग
पंतप्रधान मोदी G7 शिखर परिषदेसाठी कॅनडाच दाखल, जागतिक नेत्यांना भेटून संवाद साधणार... ट्रम्प यांच्याशीही बातचीत होण्याची शक्यता...तर भारतीयांकडून भव्य स्वागताची तयारी
पंतप्रधान मोदी G7 शिखर परिषदेसाठी कॅनडाच दाखल, जागतिक नेत्यांना भेटून संवाद साधणार... ट्रम्प यांच्याशीही बातचीत होण्याची शक्यता...तर भारतीयांकडून भव्य स्वागताची तयारी