ABP Majha Headlines 12PM एबीपी माझा हेडलाईन्स 12 PM 15 July 2024 Marathi News

Continues below advertisement

ABP Majha Headlines 12PM एबीपी माझा हेडलाईन्स  12 PM 15 July 2024 Marathi News

छगन भुजबळ अचानक शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर, दीड तास ताटकळत ठेवल्यानंतर पवारांनी बोलावलं...

शरद पवार आणि भुजबळांच्या भेटीत काय होतंय याची वाट पाहू, खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, राष्ट्रवादीमध्ये परत घेण्याबाबतचा निर्णय एकत्र बसून घेऊ, सुळेंचं वक्तव्य

खेडकर कुटुंबाच्या शोधार्थ पुणे ग्रामीण पोलीस,खेडकरांच्या बंगल्यावर जाऊनही मनोरमा, दिलीप खेडकर पोलिसांच्या हाताबाहेरच..

विशाळगडावर जाळपोळ, दगडफेक करणाऱ्या ५०० दंगेखोरांविरुद्ध गुन्हे, २१ जण पोलिसांच्या ताब्यात,संभाजीराजे छत्रपतींविरुद्धही गुन्हा

मुख्यमंत्री शिंदेंनी मध्यरात्री कोल्हापुरात येऊन घेतली विशाळगडावरील परिस्थितीची माहिती, कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस महानिरीक्षकांशी चर्चा

कोकण रेल्वेच्या रुळावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम अंतिम टप्प्यात, दोन तासांत गाड्या हळूहळू पूर्वपदावर येण्याचा अंदाज..

दरड कोसळल्याने दिवा-रत्नागिरी पॅसेंजर रद्द, तर मांडवी, जनशताब्दी, तुतारी आणि तेजस खोळंबल्या ट्रॅकवर, दक्षिणेत जाणाऱ्या गाड्या सोलापूर तर काही मिरजमार्गे

कोकण रेल्वे ठप्प झाल्यानं अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी बसची सोय, रत्नागिरी स्थानकातून ४० तर चिपळूणमधून १८ बस रवाना

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram