ABP Majha Headlines : 9 AM : 14 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  9 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्या प्रकरणात नव्यानं अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना 19 नोव्हेंबरपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या पाचजणांत शिवकुमार गौतम (Shivkumar Gautam) उर्फ शिवा या मुख्य शूटरचाही समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) विशेष पथकानं या पाचजणांना परराज्यांमधून अटक केली आहे. त्या पाच आरोपींना सोमवारी मुंबईतल्या किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. मुख्य शूटर शिवकुमार गौतमला रविवारी बहराइचमधून अटक करण्यात आलेली. शिवकुमार गौतमनं बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बिष्णोई गँगनं बाबा सिद्दिकी किंवा झिशान सिद्दिकी यांना ठार मारण्याचं काम दिलं होतं. अनमोल बिष्णोईनं त्याला आधी जे टार्गेट येईल, त्याला गोळ्या घालण्याची सूचना केली होती, असंही त्यानं सांगितलं. 

शिवकुमार गौतमनं पुढे बोलताना सांगितलं की, बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर त्यांची योजना उज्जैनला, नंतर वैष्णोदेवीला आणि शेवटी परदेशात पळून जाण्याची होती, पण ही योजना यशस्वी झाली नाही. मुंबईतून पळून जात असताना झारखंडला जाणाऱ्या एका प्रवाशाच्या फोनवरून त्यानं सहआरोपी अनुराग कश्यपशी संपर्क साधला होता, असंही गौतमनं सांगितलं. हत्येपूर्वी आणि नंतर गौतमचे शुभम लोणकर आणि झिशान अख्तर यांच्याशी नियमित बोलणं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram