ABP Majha Headlines : 12:00PM : 20 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

बदलापूरमध्ये आज इंटरनेट सेवा बंद, शाळांना सुट्टी, रेल्वेवाहतूक सुरू,  राज्यभरातही विविध भागांत आज आंदोलनाची हाक

पॉक्सो कायद्यात अधिनियम करावे लागतील, प्रलंबित शक्ती विधेयकाचं कायद्यात रूपांतर करा, विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकमांची मागणाी, एबीपी माझाशी एक्स्लुझिव्ह संवाद

बदलापूरकरांच्या आक्रोशाला राजकीय आंदोलन म्हणणाऱ्या सरकारवर मनोज जरांगेंची टीका, सरकार नालायक असल्याचा जरांगेकडून पुनरुच्चार

निवडणूक लढवण्याविषयी दोन महिन्यात निर्णय घेणार, मनोज जरांगेची स्पष्टोक्ती.. सरकार निवडणुका लांबवत असल्याने २९ ऑगस्टची बैठक होणार नसल्याचा जरांगेचा दावा 

भाजपच्या समरजित घाटगेंचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित, २३ ऑगस्टला बोलावला कार्यकर्ता मेळावा, उद्याच्या महायुतीच्या जाहीर सभेकडेही घाटगेंची पाठ

देशभरातल्या विरोधी पक्षांसह दलित संघटनांकडून आज भारत बंदची हाक, सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणबाबतच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी बंदचं आवाहन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 

राज्यात आज आदिवासी संघटनांकडून बंदची हाक, पेसा भरतीवरील स्थगिती उठवण्याची मागणी, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात आंदोलनाचे पडसाद उमटणार

राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर, राज ठाकरे गोंदियात दाखल, दुपारी दीड वाजता पदाधिकाऱ्यांशी बैठक, संध्याकाळी राज ठाकरे भंडाऱ्यात

शरद पवारच आंदोलक मनोज जरांगेच्या पाठीशी असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यालाही पवारांचा पाठिंबा असल्याचाही आंबेडकरांचा दावा

महाविकास आघाडीची आज बैठक, ट्रायडेंट हॉटेलमध्ये ११ वाजता बैठक, जागावाटपासंदर्भात होणार चर्चा

पॅरीस ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळेची आज कोल्हापुरात जंगी मिरवणूक, ताराराणी चौक ते दसरा चौकापर्यंत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी 

पुण्यात एमपीएससी परीक्षार्थींचा ठिय्या, कृषी विभागाच्या २५ ऑगस्टच्या दोन परीक्षांपैकी एक पुढे ढकलण्याची मागणी, मोठा बंदोबस्त तैनात 

पुणे झेडपीचे माझी सभापती मंगलदास बांदल ईडीच्या अटकेत, ईडीच्या छाप्यात घरामध्ये साडेपाच कोटींची रोकड आढळल्यावर कारवाई 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram