ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 12 PM : 28 जुलै 2024 : Maharashtra News

Continues below advertisement

देवेंद्र फडणवीसांनी पवार,आदित्य,उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यासाठी दबाव आणला, अनिल देशमुखांचा आरोप, मिरजेच्या समित कदमसोबत आरोपांची प्रतिज्ञापत्रे पाठवल्याचा पुन्हा दावा...

अनिल देशमुखांनी फडणवीसांबाबत केलेला दावा खरा. समित कदम यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचं कारण काय? राऊतांचा सवाल. तर  फडणवीस आणि कदमांच्या भेटीचे राऊतांनी दाखवले फोटो. 

सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मातोश्रीवर धडक, उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणावरची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी,पवारांनंतर आता ठाकरे शिष्टमंडळाच्या रडारवर... 

पुण्यातल्या पूरस्थितीला जबाबदार ठरवत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन, पण खलाटे यांना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा, खलाटे रात्रभर एकतानगरमध्ये पूरस्थिती हाताळत होते अशी माहिती.. 

लाडकी बहीण योजनेला पैसे कसले देता, कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, बच्चू कडूंची मागणी, राज्यपालांचा बंगला विकून टाका, १ लाख कोटी येतील असाही सल्ला 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram