ABP Majha Headlines : 12 PM : 22 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  12 PM : 22 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

केजरीवाल यांच्या अटकेविरुद्ध तात्काळ सुनावणीला सुप्रीम कोर्ट तयार, तीन न्यायमूर्तींचं खंडपीठ स्थापन, तर केजरीवाल यांना PMLA कोर्टात दुपारी अडीच वाजता हजर करणार 
आम आदमी पक्षाची दिल्लीत निदर्शनं, आतिशी यांना घेतलं ताब्य़ात, नागपूर आणि सोलापूरमध्ये देखील आंदोलनं 
केजरीवाल यांच्या अटकेचा शरद पवारांकडून निषेध, सत्तेचा गैरवापरकरुन केजरीवालांना अटक, भाजपवर टीकास्त्र
शासकीय आश्रमशाळांमध्ये दूध पुरवठ्यात मोठा घोटाळा, दलालीपोटी 80 कोटी रुपये दिले,  रोहित पवार यांचा गंभीर आरोप. 
सांगलीचा उमेदवार उद्धव ठाकरेंनी जाहीर करण्यावर नाना पटोलेंचा आक्षेप, घोषणा प्रॉब्लेमॅटिक असल्याची प्रतिक्रिया, तर सांगलीबाबत दिल्लीत चर्चा करु, राऊतांची सारवासारव
पुणे असो किंवा माढा, आपण कधीच निवडणूक लढवणार नाही, शरद पवार यांचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण. 
नगर दक्षिण मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीमध्ये पेच कायम, माझ्याऐवजी पत्नीला तिकीट द्या, निलेश लंकेंची भूमिका, शरद पवारांना मात्र मंजूर नाही
पंकजा मुंडेंवर नगरच्या पाथर्डीमध्ये जेसीबीतून पुष्प वृष्टी. थोड्याच वेळात पंकजा मुंडे मोहोटा देवीला दीड किलोचा चांदीचा मुकूट अर्पण करणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram