ABP Majha Headlines : 12 PM : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 12 PM : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

राज्यातल्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा, परीक्षेचा निकालही ग्रेड ऐवजी मार्क देऊन लावणार..

संभाजीनगर-पुणे रस्त्यावर रस्ता अपघातात एकाच कुटुंबातले चारजण ठार, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याची स्कॉर्पिलओला धडक, बारशाचा कार्यक्रम करुन घरी परत जाताना काळाचा घाला

महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात, ३६ मतदारसंघांचा तिढा गणेशोत्सवानंतर सोडवणार, सहा जागांवरून रस्सीखेचीची शक्यता

मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या तयारीत.२५ ते ३० सप्टेंबरदरम्यान एकदिवसीय विशेष अधिवेशनाची शक्यता. हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची जरांगेंची होती मागणी.

लाडकी बहीण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज तानाजी सावंतांच्या परांड्यामध्ये, फडणवीस उपस्थित राहणार नाहीत, अजित पवार येण्याची शक्यता कमी 

भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर, बाप्पाच्या दर्शनानंतर जे.पी नड्डा यांची फडणवीसांच्या सागर निवासस्थानी बैठक,  महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा आढावा घेणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram