ABP Majha Headlines 11AM एबीपी माझा हेडलाईन्स 11 AM 15 July 2024 Marathi News

छगन भुजबळ अचानक शरद पवारांच्या भेटीला,
भुजबळ सिल्व्हर ओकवर गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या, मिलिंद नार्वेकरही पवारांना भेटणार

विशाळगडावर जाळपोळ, दगडफेक करणाऱ्या ५०० अज्ञातांविरुद्ध गुन्हे,२१ जण पोलिसांच्या ताब्यात,संभाजीराजे छत्रपतींविरूद्धही गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली...

दरड कोसळल्यानं कोकण रेल्वेला फटका... मुंबईहून कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या १८ तासांपासून रखडल्या

दरड कोसळल्याने दिवा-रत्नागिरी पॅसेंजर रद्द, तर मांडवी, जनशताब्दी, तुतारी आणि तेजस अजूनही ट्रॅकवरच, दक्षिणेत जाणाऱ्या गाड्या पुण्यामार्गे

रायगड आणि रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट, दोन्ही जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी, तर चिपळूण बाजारपेठेत शिरलेलं वाशिष्ठीचं पाणी ओसरलं

कोकण रेल्वे ठप्प झाल्यानं अडकलेल्या प्रवाशांसाठी अतिरिक्त बसेसची सोय, रत्नागिरी स्थानकातून ४० तर चिपळूणमधून १८ बस रवाना

मुंबईतील पावसाने सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या १४ दिवसांत पूर्ण 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola