ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 PM : 31 August 2024 : Maharashtra News

Continues below advertisement

भाजपनं दीडशे जागांचा आग्रह धरल्यानं महायुतीचं जागावाटप रखडलं...अजित पवार ६० जागांसाठी तयार, एबीपी माझाला सूत्रांची माहिती, रामगिरीवर शिंदे, फडणवीस अजित पवारांची बैठक

अजितदादांनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकरांच्या समाधीचं दर्शन घेणं टाळलं...नागपुरातल्या लाडकी बहीण कार्यक्रमानंतर शिंदे, फडणवीस हेडगेवारांच्या स्मृतीभवनावर...

मोदींनी माफी मागितली तरी उद्याच्या जोडे मारो आंदोलनावर महाविकास आघाडी ठाम..मविआच्या आंदोलनाला पोलिसांची अजून परवानगी नाही...तर महायुती आंदोलनातूनच मविआला उत्तर देणार

मुंबईतल्या पालिका आणि सरकारी रुग्णालयांत सीटी स्कॅन, एमआरआयसाठी महिनोमहिने प्रतीक्षा, एबीपी माझाकडून रिअॅलिटी चेक...लक्ष घालण्याचं मुश्रीफ, केसरकरांंचं आश्वासन...

गणेशोत्सवकाळात १७ सप्टेंबरपर्यंत मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीस बंदी.. चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाचा निर्णय

सप्टेंबरमध्ये राज्यासह देशातील बहुतेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस, हवामान विभागाचा अंदाज.

बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईकर सज्ज, बाजारपेठा सजल्या.. तर चिंचपोकळीच्या चिंतामणीचं जल्लोषात स्वागत

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram