ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

भाजप आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे आणि मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट...एकमेकांशी हसतखेळत गप्पा...ठाकरेंसमोरच मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये युतीची चर्चा...

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात भाजपचे गणेश नाईक घेणार जनता दरबार...लोकांना भेटण्यासाठी महायुतीत कुणाला अटकाव नाही, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया...बावनकुळेंकडूनही नाईकांचं समर्थन..

दहावी, बारावीच्या परीक्षेला बुरखा घालून प्रवेश नको..कॉपीचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करत नितेश राणेंचं शिक्षणमंत्री दादा भुसेंना पत्र

मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार..सरकारी नोक-या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर होणार सुनावणी

सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला न्यायालयीन कोठडी, ओळख पटवण्यासाठी सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवणार

सिद्धीविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड, भाविकांना संकोच वाटेल, असे कपडे टाळण्याची मंदिर ट्रस्टची नियमावली.. तर गजानन महाराजांच्या शेगावात मात्र कोणताही ड्रेसकोड नाही, भक्त नियम पाळतातच, समितीचं स्पष्टीकरण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram