ABP Majha Headlines : 11 PM : 19 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 11 PM : 19 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपसोबत कधीच जाणार नाही, शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंचा निर्धार
उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना चिमटा, तर पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी आता वाजवले की बारा म्हणतायत, फडणवीसांनाही खोचक टोला
देशभक्त मुस्लिमांनी आम्हाला मतं दिली हे जाहीर सांगतो, सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर, तर तमाम हिंदूबांधव म्हणण्य़ाचं धाडस ठाकरेंनी केलं नाही, शिंदेंचा पलटवा
हिंमत असेल तर बाळासाहेबांचा फोटो न वापरता निवडणुका लढवून दाखवा, ठाकरेंचं आव्हान, तर बाळासाहेबांचा फोटो वापरण्याचा तुम्हाला अधिकार नाही, शिंदेंचं प्रत्युत्तर
मित्रपक्षांशी जागावाटपाचा फॉर्म्युला लवकर निश्चित करा, २२ तारखेला पक्षातल्या नेत्यांनी सल्लामसलत करा...काल दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची देवेंद्र फडणवीसांना सूचना
फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची काहीही गरज नाही, लोकसभेचा निकाल ही सामूहिक जबाबदारी, भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी टोचले महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांचे कान