ABP Majha Headlines : 11 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 11 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
आता नरिमन पॉईंट ते वांद्रे १० ते १५ मिनिटांत गाठता येणार, कोस्टल रोड - वरळी सी लिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण, अजितदादांच्या अनुपस्थितीची चर्चा
शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम महिलांना बुरख्याचं वाटप, विरोधकांकडून टीकेची झोड...तर भाजपकडूनही आक्षेप
मुस्लिमांबद्दलची वक्तव्यं खपवून घेणार नाही, अजितदादांकडून भूमिका स्पष्ट, तर नितेश राणेंकडून फक्त हिंदूंशीच व्यवहार करण्याचं आवाहन...
लाडकी बहीण योजनेसह प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा..मित्रपक्षांच्या नेत्यांविरोधात अपशब्द टाळा..अनौपचारिक गप्पांवेळी फडणवीसांचा भाजप आमदारांना कानमंत्र
शाळेत नव्याने शिक्षक, शिक्षकेतर भरतीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य, बदलापूरच्या अत्याचार घटनेनंतर शिक्षण विभागाचा निर्णय
मुंबईतल्या प्रभादेवीमध्ये रस्ता खचला, तब्बल १० ते १५ फुटांचं भगदाड, पालिका प्रशासनावर मुंबईकरांचा तीव्र संताप
सहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गौरी गणपतीचं विसर्जन, कोकणात पारंपारिक पद्धतीनं लाडक्या बाप्पाला निरोप, तर शहरांमध्ये कृत्रिम तलावाला पसंती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram