ABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

हरियाणातल्या विजयानंतर महाराष्ट्रातही भाजपचा जल्लोष...आत्मविश्वास वाढला, फडणवीसांची प्रतिक्रिया... फेक नरेटिव्हवरुन विरोधकांना टोला..

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आताच जाहीर करा, काँग्रेस, राष्ट्रवादीला माझा पाठिंबा, उद्धव ठाकरे यांची विनंती, मविआमध्ये कोणताही वाद होणार नसल्याचीही ग्वाही

मविआच्या आजच्या बैठकीत जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला..११ तारखेला पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची यादी जाहीर करण्याची शक्यता

मेट्रो-३ च्या भुयारी मार्गातून प्रवासाला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद, पहिल्याच दिवशी १५ हजार ७१३ मुंबईकरानी लुटला प्रवासाचा आनंद

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नवी मुंबईत धक्का, उपनेते विजय नाहटा यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय

म्हाडा मुंबई मंडळाच्या दोन हजार ३० सदनिकांसाठी सोडत, अनेकांच्या मुंबईतल्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार.

मुंबईच्या नद्यांमधील प्लास्टिकचं प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणार, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दोन संस्थांसोबत सामंजस्य करार

आरक्षणावरून धनगरांचं पुन्हा आंदोलन... प्रकाश शेंडगेंच्या समर्थकांच्या मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या.. तर काही धनगर कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram