ABP Majha Headlines : 11 AM : 22 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 11 AM : 22 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
सांगलीचा उमेदवार उद्धव ठाकरेंनी जाहीर करण्यावर नाना पटोलेंचा आक्षेप, घोषणा प्रॉब्लेमेटीक असल्याची प्रतिक्रिया, तर सांगलीबाबत दिल्लीत चर्चा करु, राऊतांची सारवासारव
प्रतिभा धानोरकरांच्या उमेदवारीसाठी समर्थक आक्रमक, वडेट्टीवारांना उमेदवारी दिल्यास काम न करण्याचा इशारा.
पुणे असो किंवा माढा, आपण कधीच निवडणूक लढवणार नाही, शरद पवार यांचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण. 
विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे नेते प्रचंड नाराज असल्याची माहिती, शिवतारेंवर शिवसेनेकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता
पंकजा मुंडेंवर नगरच्या पाथर्डीमध्ये जेसीबीतून पुष्प वृष्टी. थोड्याच वेळात पंकजा मुंडे मोहोटा देवीला दीड किलोचा चांदीचा मुकूट अर्पण करणार
उमेदवारी अर्ज भरताना १ हजार पेक्षा जास्त चिल्लर भरण्यास मनाई, निवडणूक आयोगाचा महत्वाचा निर्णय. 
केजरीवाल यांच्या अटकेविरुद्ध तात्काळ सुनावणीला सुप्रीम कोर्ट तयार, तीन न्यायमूर्तींचं बेंच स्थापन.
आम आदमी पक्षाकडून दिल्लीत आक्रमक निदर्शनांचा इशारा, आयटीओसह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram