ABP Majha Headlines : 11 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

छ.संभाजीनगर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा शाळांना दणका, ३३ खासगी अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक निलंबित, निवडणूक कामासाठी शिक्षकांची माहिती सादर न केल्याने कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस, अधिसूचनेपासून तब्बल २८ दिवस प्रचाराच्या तोफा, सर्व नेत्यांच्या आपापल्या होमग्राऊंडवर सभा, रॅली आणि पदयात्रा

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीत काका आणि पुतण्याची तोफ धडाडणार, शरद पवार आणि अजित पवारांच्या भाषणाकडे साऱ्यांच्या नजरा

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या आज दोन सभा, सांगता सभेनंतर उद्या घेणार तुळजाभवानीचं दर्शन

कोल्हापुरात जनसुराज्य पक्षाचे करवीरचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला, तर जळगावात अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार

संभाजीनगरच्या विशाल हिंदू धर्म जागरण महासभेत कालीचरण महाराजांची शिवराळ भाषा, जरांगेंचा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस असा उल्लेख

कोस्टल रोडचं ९३ टक्के काम पूर्ण, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वरळी ते वांद्रे थेट वाहतूक सुरु होणार, पाऊण तासांचा प्रवास अवघ्या १२ मिनिटांत 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टला कॅप्टन रोहित शर्मा मुकणार, बुमराह करणार टीमचं नेतृत्व, २२ तारखेपासून सुरु होतेय पहिली टेस्ट..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram