ABP Majha Headlines : 11 AM : 17 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

छगन भुजबळ नाराज असल्याचं कानावर, जयंत पाटलांची प्रतिक्रिया तर भुजबळ फक्त जागावाटपार्यंतच नाराज होते, तटकरेंचं स्पष्टीकरण

मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या महायुतीच्या सांगता सभेत मोदी आणि राज ठाकरेंची तोफ धडाडणार , सभेपूर्वी मोदी चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि बाळासाहेब स्मृतीस्थळाला भेट देणार

११ मे पासून माध्यमापासून दूर असणारे अजित पवार महायुतीच्या सभेत भाषण ठोकणार, अजितदादा पुन्हा सक्रिय झाल्याची तटकरेंची माहिती

महामुंबईसाठी बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची महासभा.. शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगेंसह  अरविंद केजरीवालही  उपस्थित राहणार

गेल्या १० वर्षांपासून बहुमत असतानाही संविधान बदलण्याचा प्रयत्न नाही,....  केवळ राजकीय स्थैर्यासाठीच ४०० जागा हव्यात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं स्पष्टीकरण

४ जूननंतर देश 'डिमोदीनेशन' होणार, तर दोन वर्षांनंतर मोदीच निवृत्त होणार , एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मोदींच्या नाशिकच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्या किरण सानपनं घेतली शरद पवारांची भेट.. शेतकरी म्हणून सभेसाठी गेलो होतो, किरणचं स्पष्टीकरण

३० वर्षात भाजपमध्ये विलीन झालो नाही तर आता काँग्रेसमध्ये कसं विलीन होणार, विलीनीकरणाच्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंचा मोदींवर पलटवार

होर्डिंग दुर्घटनेनंतर फरार असलेला भावेश भिडे उदयपूरमधून गजाआड,  पुढील तपासाची सूत्रं क्राईम ब्रांचकडे

मुंबईत उष्णतेसोबत आर्द्रता वाढणार, दमट वातावरणामुळे उकाड्यात आणखी भर पडणार, २४ तास उष्ण आणि दमट वातावरण

यंदा मान्सून महाराष्ट्रात वेळेवर दाखल होणार, ७ जून रोजी मान्सून तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज तर जून महिन्यात चांगल्या पावसाचा शक्यता

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram