ABP Majha Headlines : 11.00 AM : 13 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

अरविंद केजरीवालांना जामीन, १० लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजुर.

लालबागच्या राजाच्या दरबारात गरीब श्रीमंत भेद, व्हीआयपींना राजाचं आरामात दर्शन, सामान्यांना पायावर डोकं ठेवण्यासही मनाई

नागपूर ऑडी दुर्घटनेतला मद्यधुंद चालक अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार निसटण्याची शक्यता, दोघांच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण गुन्ह्यासाठी अपुरे..

पुण्यात हडपसरमध्ये कोयता आणि तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न, टोळक्यानं पेटवलेली टेम्पो ट्रॅव्हल्स बस जळून खाक..

महायुतीला विदर्भात २५ जागा मिळण्याचा भाजपच्या सर्व्हेतून निष्कर्ष, नागपुरात भाजपला केवळ ४ जागा मिळत असल्याचं सर्व्हेत धक्कादायक चित्र

काँग्रेस प्रथमच तीन पातळ्यांवर जाहीरनामा प्रसिद्ध करणार, राज्य, जिल्हा आणि प्रत्येक उमेदवाराचा स्वतंत्र जाहीरनामा राहणार..

नवऱ्याच्या प्रेयसीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार होऊ शकत नाही, मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा..प्रेयसी नातेवाईक नाही असं निरीक्षण...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram