ABP Majha Headlines : 11 AM : 03 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 11 AM : 03 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
लोकसभा निकालांची देशभर उत्सुकता शिगेला, निकालांना उरले अवघे २० तास, मतमोजणीसाठी देशभर यंत्रणा सज्ज
भाजपचा पराभव होणारच, इंडिया आघाडी २९५ ते ३१० जागा जिंकून सरकार स्थापन करेल, सामनाच्या अग्रलेखातून दावा
मतमोजणीसाठी स्ट्राँग रूममधून काढल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन्स बदलल्या जाण्याची काँग्रेसला शंका, स्ट्राँग रूमवर नजर ठेवण्याची काँग्रेस नेतृत्वाची कार्यकर्त्यांना सूचना
चीनच्या सरकारी मीडियात मोदींच्या तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शक्यता, चीनसोबत मैत्रीसाठी मोदी प्रयत्न करतील असा ग्लोबल टाईम्सचा दावा
कन्याकुमारीतील ध्यानधारणेवर पंतप्रधान मोदींचा वर्तमानपत्रात लेख, साधनेनं विचारांना नवी उंची मिळाल्याची भावना, २०४७ विकसीत भारतसाठी रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्मचं व्हिजन
मुंबई पदवीधर मतदारसंघातून आज ठाकरे गटाचे अनिल परब अर्ज दाखल करणार, आदित्य ठाकरेही राहणार उपस्थित, दुपारी १२ वा. नवी मुंबईत कोकण भवन इथे फॉर्म भरणार