ABP Majha Headlines 10PM एबीपी माझा हेडलाईन्स 10PM 23 July 2024 Marathi News
केंद्र सरकारकडून रेल्वेला अडीच लाख कोटींचा अभूतपूर्व निधी, १ लाख कोटींहून अधिकचा निधी सुरक्षा यंत्रणांवर खर्च करणार
नवीन कररचनेत ३ ते ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के टॅक्स, करात १७ हजार ५००च्या घरात फायदा, तर स्टँडर्ड डिडक्शन 50 हजारांवरून 75 हजारांवर,
मोबाईल फोन, चार्जर, इलेक्ट्रिक वाहनं, कॅन्सरची औषधं, सोलर पॅनल स्वस्त होणार, आयात शुल्क कमी करण्यासह बजेटमधील इतर तरतुदींचा सकारात्मक परिणाम
कस्टम ड्यूटी कमी केल्यानं सोन्याच्या दरात मोठी घट, मुंबईसह अनेक शहरांत सोनं ५ हजारांनी स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण...
बजेटमध्ये मुंबई मेट्रोसाठी १ हजार ७८७ कोटी, तर महाराष्ट्रातील रेल्वेसाठी १५ हजार कोटींची तरतूद...नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती...
संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हेंच्या आजारी साखर कारखान्यांना मार्जिन लोनमधून वगळण्याच्या हालचाली, राजकीय समीकरणं बदलल्यानं निर्णय झाल्याची चर्चा