ABP Majha Headlines 10 PM एबीपी माझा हेडलाईन्स 10 PM 24 July 2024 Marathi News

ABP Majha Headlines 10 PM एबीपी माझा हेडलाईन्स 10 PM 24 July 2024 Marathi News

अजित पवार, ठाकरेंना खोट्या आरोपात गोवण्यासाठी दबाव टाकला, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे फडणवीसांवर आरोप...तर देशमुखांच्या अनेक वादग्रस्त क्लिप माझ्याकडे, वेळेवर बाहेर काढेन, फडणवीसांचा इशारा...

श्याम मानव सुपारी घेणाऱ्यांच्या मागे लागले, मानव यांच्या आरोपांनंतर फडणवीसांची टीका...तर सुपारी देण्याची क्षमता फडणवीसांकडे जास्त, मानव यांचा पलटवार..

गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी आपल्याला अनेकदा धमकावलं होतं, जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांची सीबीआयसमोर कबुली, तर आरोपांवर बोलण्यास देशमुखांचा नकार

आपल्याला जेलमध्ये पाठवून ठार मारण्याचा फडणवीसांचा प्लॅन, मनोज जरांगेंचा सनसनाटी आरोप, उपोषणामुळे संताप झाला असेल, फडणवासांचं उत्तर 

महायुतीमधील केवळ भाजपचेच उमेदवार पाडणार, मनोज जरांगेंचा इशारा...त्रास देणाऱ्यांना धडा शिकवण्याचा केला निर्धार...

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola