ABP Majha Headlines : 10 PM : 16 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

४ जूननंतर देश 'डिमोदीनेशन' होणार, तर दोन वर्षांनंतर मोदीच निवृत्त होणार , एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

३० वर्षात भाजपमध्ये विलीन झालो नाही तर काँग्रेसमध्ये कसं विलीन होणार, विलीनीकरणाच्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंचा मोदींवर पलटवार

भाजपसोबत न जाण्याची अट राऊतांनी अमान्य केल्यानं चर्चा फिस्कटली, प्रकाश आंबेडकरांचा 'माझा'वर गौप्यस्फोट, भाजपसोबत चर्चेची
दारं बंद करणार नाही अशी राऊतांची भूमिका होती, आंबेडकरांचा दावा

मुंबईत शिवाजी पार्कवर उद्या महायुतीच्या सभेचं आयोजन, पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार.. भाजपकडून सभेचा टीझर जारी

मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील महायुतीचे अनधिकृत बॅनर हटवले, नरेंद्र मोदींच्या अनधिकृत बॅनरवर निवडणूक आयोगाची कारवाई...शिवाजी पार्कवर उद्या मोदींची सभा...

नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी, माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही, मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना टोला

मोदींचा आत्मविश्वास ढासळलाय..म्हणून धर्माच्या आधारे टीकाटीपण्णी सुरू, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा.. 

घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला बेड्या, राजस्थानातल्या उदयपूरमधून मुंबई पोलिसांकडून अटक.

मुंबई, पुणे, नागपूरमधील होर्डिंग्जचा एबीपी माझाकडून रिअॅलिटी चेक.. होर्डिंग्जचं कोट्यवधी रुपयांचं अर्थकारण समोर

राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर..ठाणे, नवी मुंबईत पावसाची हजेरी.. तर जव्हार, मोखाडाला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram