ABP Majha Headlines : 10 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

विधानसभा निवडणुकीत महायुती १८० जागा जिंकणार, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास, ४०० पारच्या नाऱ्यामुळे कार्यकर्ते गाफिल राहिल्याने लोकसभेला फटका, शिंदेंचीही कबुली

फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्यात एनजीओंमध्ये अर्बन नक्षली घुसलेत, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप तर मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्याही याच एनजीओ, शिंदेंचा दावा

ठाण्यातून महायुतीला तडीपार करू असं म्हणणाऱ्यांनाच जनतेनं तडीपार केलं, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
(('महायुतीला तडीपार करू म्हणणारेच तडीपार'))

कोकण पदवीधर निवडणुकीत अभिजीत पानसेंची उमेदवारी मागे घेतल्याबद्दल राज ठाकरेंचे आभार, ठाण्यातील महायुतीच्या मेळाव्यात फडणवीसांचं वक्तव्य
((राज ठाकरेंचे आभार-फडणवीस))

वायकरांच्या मेहुण्याने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन, मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाच्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल, तर विरोधकांचा रडीचा डाव, वायकर यांनी आरोप फेटाळले 

ईव्हीएम आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही, ईव्हीएमला ओटीपी लागतच नाही, निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण.

ईव्हीएम हॅक होण्याचा धोका कायम, त्यांचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे, टेस्लाचा सीईओ एलन मस्कचं मत, तर भारतीय ईव्हीएम हॅक करणं अशक्य, माजी केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांचं प्रत्युत्तर 
((ईव्हीएम हॅक करणं शक्य-एलन मस्क))

 

पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, महायुतीचे तीनही महत्वाचे नेते दिल्लीला जाणार, राष्ट्रवादीला हवी आहेत एक कॅबिनेट दोन राज्यमंत्रिपदं.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना उद्या राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटणार, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन द्या, हाकेंची मागणी

 

आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबाचं सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर, पंकजांच्या पराभवामुळे आत्महत्या केल्याची चर्चा
((...आणि पंकजांना अश्रू अनावर))

सातारा जिल्ह्यातलं बलकवडी धरण कोरडंठाक, पुरेसा पाऊस न झाल्यानं धरणातला पाणीसाठी घटला, २४ वर्षांनी २ मंदिरांचे अवशेष दिसू लागले

शीना बोराचे अवशेष गहाळ होणं अतिशय धक्कादायक, आरोपी इंद्राणी मुखर्जीची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया, शीना बोरा जिवंत असल्याचाही पुनरुच्चार
((मी निर्दोष आहे-इंद्राणी मुखर्जी))

उधमपूर-जम्मू-बारामुल्ला रेल्वे मार्गाचं काम जवळपास पूर्ण, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, संगलदान ते रीसी टप्प्यात पहिली चाचणी यशस्वी
((उधमपूर-बारामुल्ला रेल्वेचं काम जवळपास पूर्ण))

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram