ABP Majha Headlines : 10 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

उद्धव ठाकरेंची दिल्लीत पंतप्रधानांसोबत बैठक झाली होती, मविआलाही फसवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न,माझं व्हिजनमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

२०१९मध्ये ठाकरेंनी भाजपचे उमेदवार पाडले, देवेंद्र फडणवीसांचा आरोप, ठाकरेंनीच बेईमानी केल्याचाही फडणवीसांचा घणाघात

मविआचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती, माझा व्हिजनमध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट, ती बैठक केवळ गप्पांसाठी होती, राऊतांचा पलटवार

घाटकोपर दुर्घटनास्थळी अजूनही ३० ते ४० लोक अडकल्याची शक्यता, बचावकार्य पूर्ण व्हायला आणखी २४ तास लागण्याची यंत्रणांची माहिती

घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे  कुटुुंबासह फरार, भिंडेंने विधानसभा निवडणूक लढवल्याचं समोर, २००९ मधील प्रतिज्ञापत्र एबीपी माझाच्या हाती

डीएचएफएल बँक गैरव्यवहारप्रकरणी धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक, वाधवान विरोधात २०२२ मध्ये सीबीआयचं आरोपपत्र

मनोज जरांगेंची पुन्हा उपोषणाची हाक, मराठा आरक्षणासाठी ४ जूनपासून करणार उपोषण..

पंतप्रधान मोदींचा उद्या मुंबईतील घाटकोपरमध्ये रोड शो...मुंबईतील वाहतुकीत बदल... एल.बी.एस मार्ग उद्या दुपारी २ ते रात्री १० पर्यंत बंद राहणार..

भारताचे माजी लष्करी अधिकारी कर्नल वैभव काळे यांचं इस्रायल हमास संघर्षात निधन, गाझा इथे होते संयुक्त राष्ट्रांच्या मिशनवर

चंद्राबाबू नायडू यांचा फौजदारी अर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला.. २०१०साली नांदेडमधील बाभळी बंधारा आंदोलनप्रकरणी चंद्राबाबू नायडूंना दिलासा नाही

राज्यात आजही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, रायगड, सोलापूर, वाशिम, परभणीत पावासाची हजेरी, अवकाळीने शेतकरी हैराण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram