ABP Majha Headlines : 10 PM : 09 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला दिमाखदार सोहळा 

मोदी सरकारच्या ७२ मंत्र्यांचा शपथविधी, मोदींसह ३० कॅबिनेट मंत्री तर ४१ राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ 

राजनाथ सिंग, अमित शाह, नितीन गडकरी, पियूष गोयल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, अनेक जुने सहकारी पुन्हा टीम मोदीमध्ये 


महाराष्ट्राकडे ६ मंत्रिपदं, नितीन गडकरी, पियुष गोयल यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर प्रतापराव जाधव, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

मोदींच्या मंत्रिमंडळात सहा महिलांना संधी, सीतारामन, शोभा करंदालजे, अन्नपूर्णा देवी, अनुप्रिया पटेल, रक्षा खडसेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आता खातेवाटपाकडे लक्ष, अर्थ, गृह, संरक्षण, परराष्ट्र ही महत्त्वाची खाती भाजप स्वत:कडे ठेवण्याची शक्यता...

एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, चिराग पासवान यांनी चारच जागा जिंकूनही एक कॅबिनेट मंत्रिपद पटकावलं, शिवसेनेला मात्र एकच राज्यमंत्रिपद 
((शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडली?)) 

राष्ट्रवादीविनाच आजचा शपथविधी, भाजपनं ऑफर केलेलं राज्यमंत्रिपद मान्य नाही, अजित पवारांचं विधान, तर विस्तारादरम्यान कॅबिनेट मंत्रिपद देणार, फडणवीसांची ग्वाही

शपथविधी सोहळ्याला शाहरुख खान, अक्षय कुमार, विक्रांत मस्सी यांची उपस्थिती, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत देखील हजर 
(())

अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्याचा मार्ग मोकळा, दोन एकर जागा देण्यास उत्तर प्रदेश सरकारची मंजुरी
((अयोध्येत महाराष्ट्र सदनाचा मार्ग मोकळा))

जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार, बस दरीत कोसळली, १० जणांचा मृत्यू

पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर समर्थकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा दावा, तर जिवाचं बरवाईट करुन घेऊ नका, पंकजा मुंडे आणि धनजंय मुंडेंचं आवाहन

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी, पुणे, मुंबई, नाशिक, धारशिवसह कोकणात मुसळधार, मुंबईत पावसाचा जोर वाढला

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram