ABP Majha Headlines : 10 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

हरियाणात भाजपची हॅटट्रिक, तिसऱ्यांदा सत्ता स्थापणार...गेल्या वेळच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढूनही सत्तास्थापनेची संधी हुकली...

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचं सरकार येणार...पण काँग्रेसच्या जागा घसरल्या...भाजपला जम्मूत मोठं यश...पीडीपीचं पानिपत...

काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात...दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात विजयाचा जल्लोष...

हरियाणातल्या विजयानंतर महाराष्ट्रातही भाजपचा जल्लोष...आत्मविश्वास वाढला, फडणवीसांची प्रतिक्रिया... फेक नरेटिव्हवरुन विरोधकांना टोला..

भाजपशी थेट सामना होतो तिथे काँग्रेस कमकुवत पडते'.. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचा निकालानंतर काँग्रेसला टोला, रणनीती तपासण्याचा सल्ला...

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपाची उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात.. फडणवीसांच्या बंगल्यावर प्रभारींसह ज्येष्ठ नेत्यांची बैठक... 

अजित पवार बारामती मधूनच लढणार.. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांची घोषणा, तर अजित पवारांनी बारामतीतूनच लढावे म्हणून बारामतीकर आक्रमक

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आताच जाहीर करा, काँग्रेस, राष्ट्रवादीला माझा पाठिंबा, उद्धव ठाकरे यांची विनंती, मविआमध्ये कोणताही वाद होणार नसल्याचीही ग्वाही

मविआच्या आजच्या बैठकीत जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला..११ तारखेला पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची यादी जाहीर करण्याची शक्यता

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram