ABP Majha Headlines : 6:30 AM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  6:30 AM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन

देशातील प्रसिद्ध उद्योगपती यांचे आज (दि.9) निधन झाले. ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते.  ज्येष्ठ पत्रकार गिरिश कुबेर यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं की, देशासाठी आदर्श व्यक्तिमत्वाचा, शालिन उद्योगपती आपल्यातून गेला आहे. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योगविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. भारतीय उद्योगसमूहाचं एक प्रेमळ आणि सोज्वळ असं स्वरुप रतन टाटा यांचं होतं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram