ABP Majha Headlines : 2 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

 ABP Majha Headlines :  2 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

देशाच्या उद्योगविश्वातील आदरणीय आणि गुरुतुल्य व्यक्तिमत्व असलेल्या रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. रतन टाटा यांच्या जाण्याने भारतीय उद्योग जगतातील एका पर्वाचा अंत झाला आहे. केवळ एक उद्योगपती म्हणूनच नव्हे तर आपली साधी राहणी, परोपकारी आणि दानशूर वृत्तीमुळे रतन टाटा (Ratan Tata) अनेकांसाठी आदर्श आणि प्रेरणास्थान झाले होते. त्यामुळे रतन टाटा यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, उद्योग, कला आणि सामान्य वर्ग अशा सर्वच स्तरातून शोकाकुल प्रतिक्रिया उमटत आहेत. याविषयी 'दैनिक लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना रतन टाटा हे इतक्या मोठ्या उंचीला का पोहोचले, याविषयी सविस्तर विवेचन केले. 

रतन टाटांची महती आणि प्रभाव इतका का असावा याविषयी बोलताना गिरीश कुबेर यांनी म्हटले की, केवळ उद्योगपती या एका शब्दाने त्यांचे वर्णन करता येणे अयोग्य आहे, करणे अयोग्य आहे. याचे कारण असं की ते केवळ पैसा आणि उद्योग आणि संपत्ती निर्मिती करणारा एक व्यक्ती एवढ्यापुरतच मर्यादित नव्हते. भारतीय संस्कृती, भारतीय अभिजातता आणि भारतीय मातीच्या गरजा यांचा विचार करून ज्यांनी एक सम्यक साम्राज्याची, उद्योग साम्राज्याची निर्मिती केली असा तो द्रष्टा, संपत्ती निर्मितीकार होता असं त्यांचे वर्णन करावे लागेल. आणि सर्वसाधारणपणे भारतीय उद्योगपती हे भारत सरकारच्या धोरणांच्या अनुषंगाने त्याच्या कलाकलाने आपले उद्योग साम्राज्य रेखत असतात, आखत असतात. पण रतन टाटांनी असं कधीही केलं नाही. ज्याचा सरकारशी काहीही संबंध नाही, सरकारी धोरणांच्या सहभागाची किंवा मदतीची गरज नाही अशा स्वरूपाची उद्योग स्वप्नं त्यांनी पाहिली. दुसरं असं की फार उद्योगपती या शब्दाशी जे जे काही बाकीचे नकारात्मकता जी जोडली गेलेली असते ती त्यांच्या बाबतीत कधीही झालं नाही. त्यांना कधीही ती नकारात्मकता शिवली नाही आणि ते सर्वसाधारण संपूर्ण आयुष्यभर आदरणीयच राहिले. अशी फार कमी माणसं आपल्यामध्ये आहेत. त्यामुळे रतन टाटा यांच्या जाण्याने आपण नक्की काय गमावलंय ते मला असं वाटत की हे सुद्धा आपल्याला कळायला काही अवधी जावा लागेल, असे गिरीश कुबेर यांनी म्हटले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram