ABP Majha Headlines : 9 AM : 10 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines :  9 AM : 10 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांचा आज जनतेशी संवाद, कार्यकर्त्यांना लिहिलं भावनिक पत्र, जाधवांची भावनिक पोस्ट व्हायरल
आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा धडाका, दोन दिवसांत तब्बल २६९ शासन निर्णय.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर. माळवाडीतील एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही उपस्थिती.
भाजपच्या लोकसभा उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता, संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक.
आचारसंहिता लागण्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा, तीन वर्ष आधीच राजीनामा दिल्याने खळबळ
पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे आज पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. तर कोल्हापुरातील विमानतळाचं मुख्यमंत्री शिंदे करणार उद्घाटन.
मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असं नाव निश्चित, तर उद्या होणार कोस्टल रोडचं उद्घाटन. 
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी ब्लॉक. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram