ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 10 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स
राजीनाम्याच्या मागणीवर चर्चा पक्षश्रेष्ठींशी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत, नागपुरात संघ अधिकाऱ्यांची फडणवीसांशी चर्चा
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती, चंद्राबाबूंच्या पक्षाला चार तर नितीश कुमारांच्या जे़डीयूला तीन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता
((मोदी कॅबिनेटचा फॉर्म्युला 'माझा'च्या हाती))
नवनीत आणि रवी राणांना तातडीनं दिल्लीला येण्याचा निरोप, भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे निर्देश, आज रात्री उशिरा दिल्लीला पोहोचणार
मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक सुरू, बैठकीला अनेक आमदार गैरहजर, लोकसभेतील पराभवानंतर नाराज आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा
भाजपला संपवायचं असल्यास विधानसभेत काँग्रेसला झुकतं माप मिळालंच पाहिजे, पटोलेंचं मोठं विधान...काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नाना पटोलेंची लाडूतुला...
सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील काँग्रेससोबतच राहणार, नवी दिल्लीत घेतली सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट
शिवसेनेसोबत माझा प्रासंगिक करार.. मविआचे खासदार कल्याण काळेंची भेट घेणाऱ्या अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.. दानवेंच्या पराभवावरुनही सत्तारांचा मिश्किल टोला
निवडणुकीच्या काळात किरण सामंतांनी ठाकरेंची भेट घेतली, तर सामंतांच्या मतदारासंघात अपेक्षित लीड मिळला नाही, भाजपच्या निलेश राणेंचे गंबीर आरोप, तर सामंतांचंही उत्तर
नारायण राणे सहकुटुंब राज ठाकरेंच्या भेटीला.. लोकसभेतील विजयानंतर राज ठाकरेंच्या भेटीसाठी नारायण राणे शिवतीर्थवर
बारामतीतल्या विजयानंतर सुप्रिया सुळेंचं पुण्यात जंगी स्वागत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन..