ABP Majha Headlines : 9 AM :10 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 9 AM  :10 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

नागपूरच्या कन्हानमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा, रामटेक, नागपूर आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी एकत्रित प्रचार, मुख्यमंत्र्यांकडून सभास्थळाची पाहणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा उद्या नांदेड दौरा,  महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्यासाठी नरसी गावात सभा घेणार 
मी गुपितं सांगू लागलो तर समाजात फिरणं जड जाईल, सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या आपल्या नातेवाईकांना अजित पवारांचा इशारा
मविआच्या मुंबईतील जागावाटपावरून काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी, मित्रपक्षांचा प्रचार करणार की नाही यावर आजच्या बैठकीत निर्णय घेणार 
लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा, नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्षांची घोषणा
सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्याबद्दल सांगली काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक, अपक्ष उभं राहण्याबद्दल विशाल पाटील काय निर्णय घेतात याकडे लक्ष

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram