ABP Majha Headlines : 8 AM :10 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Headlines : 8 AM  :10 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स 

लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा, नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्षांची घोषणा
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडून राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याचं स्वागत, राज ठाकरेंनी कोणतीही अट ठेवलेली नाही, मुख्यमंत्र्यांकडून खास उल्लेख
नागपूरच्या कन्हानमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा, रामटेक, नागपूर आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघासाठी एकत्रित प्रचार, मुख्यमंत्र्यांकडून सभास्थळाची पाहणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या नांदेडमध्ये, नरसी इथं जाहीर सभा घेणार
मी गुपितं सांगू लागलो तर समाजात फिरणं जड जाईल, सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या आपल्या नातेवाईकांना अजित पवारांचा इशारा
मविआच्या मुंबईतील जागावाटपावरून काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी, मित्रपक्षांचा प्रचार करणार की नाही यावर आजच्या बैठकीत निर्णय घेणार 
उमेदवारांनी जंगम मालमत्ता जाहीर करणं गरजेचं नाही, लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय
१० टक्के मराठा आरक्षणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी, आरक्षणाचे समर्थन आणि विरोध करणाऱया 18 याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram