ABP Majha Headlines : 10 AM : 17 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 10 AM : 17 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज महायुतीची सांगता सभा , पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार.. सभेच्या पार्श्वभूमीवर दादरमधील वाहतुकीत बदल
आज मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा.. शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगेंसह अरविंद केजरीवालही उपस्थित राहणार
गेल्या १० वर्षांपासून बहुमत असतानाही संविधान बदलण्याचा प्रयत्न नाही,.... केवळ राजकीय स्थैर्यासाठीच ४०० जागा हव्यात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं स्पष्टीकरण
४ जूननंतर देश 'डिमोदीनेशन' होणार, तर दोन वर्षांनंतर मोदीच निवृत्त होणार , एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
३० वर्षात भाजपमध्ये विलीन झालो नाही तर आता काँग्रेसमध्ये कसं विलीन होणार, विलीनीकरणाच्या टीकेवरुन उद्धव ठाकरेंचा मोदींवर पलटवार
मोदींच्या नाशिकच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्या किरण सानपनं घेतली शरद पवारांची भेट.. शेतकरी म्हणून सभेसाठी गेलो होतो, किरणचं स्पष्टीकरण
घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला बेड्या, राजस्थानातल्या उदयपूरमधून मुंबई पोलिसांनी केली अटक, राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी