ABP Majha Headlines : 10.00 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
भाजपनं ठेवलं १२५ जागांच्या विजयाचं उद्दिष्ट,जिंकण्यासाठी संघर्ष होईल अशा ७५ जागांवर विशेष लक्ष देणार, सहा नेत्यांवर सोपवली विभागवार जबाबदारी...
मुख्यमंत्री शिंदे - अजित पवार यांची वर्षावर महत्त्वपूर्ण बैठक, शिवसेना राष्ट्रवादीच्या आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर खलबतं, लाडकी बहीण योजनेच्या अहवालावरही चर्चा
आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता, अंबादास दानवे यांची एबीपी माझाला EXCLUSIVE माहिती
((मुस्लिम उमेदवार देणार ठाकरे?))
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंची पुराच्या पाण्यातून स्टंटबाजी. गाडीच्या बोनेटवर बसून बनवली रील. पडोळेंची रील सोशल मीडियावर व्हायरल.
भाग्यश्री आत्राम हलगेकर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार, तर भाजपचे भास्करराव खतगावकर आणि गोपाळदास अग्रवालही काँग्रेसच्या वाटेवर...
(())
मुंबईतील कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा पूल आजपासून खुला होणार, वांद्रेकडील दिशेनं जाणाऱ्यांची मोठी सोय, दुसरी मार्गिका खुली होण्यासाठी मात्र आणखी कालावधी लागणार
((आजपासून कोस्टल रोडवरून थेट सी-लिंक!))
बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊतांचे आजपासून ठिय्या आंदोलन, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी..जरांगेंच्या आंदोलनाला देणार प्रत्युत्तर...
नागपूर महापालिकेच्या ३९ कर्मचाऱ्यांवर आयुक्तांकडून निलंबनाची कारवाई, कामात हयगय केल्याचा ठपका. आयुक्तांच्या स्वच्छता पाहणी दौऱ्यात होते गैरहजर...
मुंबईतील वर्सोवा खाडी ते मढ पुलाचा खर्च दोन वर्षांत १ हजार ९०० कोटींनी कसा वाढला, काँग्रेस नेते रवी राजा यांचा मुंबई महानगरपालिकेला सवाल
((दोन वर्षांत १९०० कोटींनी वाढला खर्च?))
महायुतीमध्ये जवळपास ४० जागांवर एकमत होईना, वाद असलेल्या ४० जागांची यादी एबीपी माझाच्या हाती...सामोपचारानं तोडगा काढण्याचे प्रयत्न...
बीएमसी मुंबईत उभारणार १०० कोटींचं मच्छिमार्केट, प्रधानमंत्री मस्त्यसंपदा योजनेअंतर्गत मरोळ फिश मार्केटची पुनर्बांधणी
नाशिक शहरातील ११ प्रमुख मार्गावरील
वाहतूक आजपासून बंद. गणेशोत्सवाच्या
पार्श्वभूमीवर नाशकातील रस्ते ५ दिवस बंद.
नाशिकच्या साल्हेर किल्ल्याला मिळणार
जागतिक पर्यटनाचा दर्जा. नाशिकच्या
जिल्हाधिकाऱ्यांनी केली किल्ल्याची पाहणी.युनेस्कोचं पथक १ ऑक्टोबरला साल्हेर
दौरा करणार.